पाकिस्तानला १ अब्ज २३ कोटी   

डॉलर्सच्या कर्जाचे अखेर  वितरण

कराची/ इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंजूर केलेले १ अब्ज २३ कोटी डॉलर्सचे कर्ज बुधवारी पाकिस्तानला देण्यात आले. पाकिस्तानला देण्यात येणार्‍या निधीपैकी कर्जाचा दुसरा हप्ता आहे.
 
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज वितरणाबाबत नुकतीच आभासी बैठक घेतली आगामी अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर नाणेनिधीचे प्रतिनिधी इस्लामाबादला येणार होते. पण, सुरक्षेच्या कारणामुळे त्यांचा दौरा लांबला. दरम्यान, अंदाजपत्रक २ जून रोजी सादर करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यापूर्वी कर्ज मिळावे, यासाठी खटपट सुरू होती. त्यामुळे नाणेनिधीसोबतची चर्चा आता १६ मे पर्यंत सुरू राहणार आहे. १६ मे पर्यत परदेशी गंगाजळीत कर्जाचा दुसरा हप्ता जमा होईल, असेही सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात नाणेनिधीने कर्ज मंजूर केले होते.आता त्याचे वितरण केल्याचे सांगितले आहे. 

Related Articles